15 दिवसात वजन कमी करण्याचे 8 घरघुती उपाय -Weight Loss

वाढलेले पोट आजकालची गंभीर समस्या बनलेली आहे. यामुळे आपल्याला फॅशनचे कपडे घालता येत नाही व आपण सुंदर दिसत नाही. लठ्ठपणा एक आजार असून यामुळे केवळ पर्सनॅलिटी खराब होते नाही तर हा इतर आजारांनाही आमंत्रण देतो. लठ्ठपणा वाढल्यास हाय ब्लड प्रेशर कंबरदुखी हृदयाचे आजार गुडघेदुखी यासारखे आजार होण्याचा धोका वाढतो त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक डायटिंग करतात किंवा तासंतास जिम मध्ये घाम घालतात परंतु यामध्ये त्यांची सातत्य राहत नाही त्यामुळे त्यांचे वजन कमी होत नाही आणि वजन कमी न होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा डायट चार्ट योग्य नसतो आहाराकडे योग्य लक्ष आणि थोडासा व्यायाम केल्याने वजन लवकर कमी करणे शक्य आहे. खाली दिलेले 8 घरघुती उपाय केल्याने वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. 

Weight Loss

01) मध आणि लिंबू पाणी

आपणाला अनेकांनी हा उपाय सांगितला असेल लिंबू आणि मधाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते आपण जर नियमित लिंबू आणि मधाचे पाणी पिले तर आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल यासाठी तुम्ही सकाळी उठल्या नंतर एक ग्लास कोमट पाण्यात पाव तुकडा लिंबाचा रस मिक्स करावा आणि त्यात एक चमचा मध घालावे याची रोज सेवन केल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते तसंच लिंबू आणि मध हे पचनक्रिया डिटेल्स करण्यासाठी उत्तम ठरते त्यामुळे आपली पचनक्रिया सुद्धा सुधारते.

02) जिऱ्याचे पाणी

आपण जीरा टाकून पाणी गरम करून पिल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत मिळते जिऱ्याचे पाणी मेटाबोलिझम पोस्ट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते तुम्ही रात्री एक ग्लासात जिरे भिजवा आणि रात्रभर तसंच ठेवा सकाळी हलकेसे हे पाणी उकळा आणि त्यानंतर प्या ा जिर्‍याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एंजाइम्स वाढतात आणि मेटाबोलिझम वाढते त्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि असलेली चरबी वितळण्यास मदत होते.

वजन कमी करण्याठी महत्वाचे ५ योग येथे Click करा.

03) ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे चयापचय क्रिया सुधारून शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत होते त्यामध्ये असणाऱ्या कॅफिन मुळे व्यक्तीची मरगळ जाऊन त्याला तरतरी येण्यास मदत होते व वजनही कमी होते.

04) फास्टफूड चे सेवन टाळणे

आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये फास्ट पुढचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहे यामुळे शरीरात चरबी तयार होऊन वजन वाढते व या मध्ये कोणतेही पौष्टिक पदार्थ नसतात त्यामुळे फास्ट फूड चे सेवन टाळणे गरजेचे आहे.

05) आहारामध्ये दही किंवा ताक यांचे सेवन करणे

दह्याचे व ताकाचे सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत मिळते आपण दिवसातून दोन-तीन वेळेस टाक किंवा दही खावे यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत मिळते व शरीराची भूक सुद्धा भागवल्या जाते.

 

वजन कसे कमी करावे यासाठी येथे Click करा 

06)पपईचे सेवन

पपईचे नियमित सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते पपई हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. पपई खाल्ल्याने आपल्याला पोट भरले असे वाटते त्यामुळे पपईचे सेवन करणे म्हणजे वजन कमी करणे होय

07) पुरेशी झोप घेणे

तुम्ही जर शरीराला आवश्यक तितकी झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम देखील तुमच्या वजन वाढीवर होऊ शकतो अपुऱ्या झोपेमुळे दिवसभराची कामे करताना शरीर आणि मेंदूवर ताण येतो परिणामी वजन वाढण्याची शक्यता असते अशावेळी सात ते आठ तासाची रात्रीची झोप घेणे आवश्यक असते.

 08) ताण तणाव कमी करणे

शरीर व मनावर ताण आल्याने वजनात वाढ होऊ शकते त्यामुळे मन शांत राहण्यासाठी व त्यावरील ताण कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करू शकतात.

वाढलेले वजन आणि पोटावरील चरबी केवळ निरोगी पद्धतीने कमी केली जाऊ शकते त्यामुळे वजनाबाबत ठरवलेले ध्येय गाठण्यासाठी तुम्ही पूर्णपणे आपले आरोग्य व्यायाम व आहाराकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते आपल्या जीवनशैलीत जर योग्य व आवश्यक तो बदल आणि पोषक आहार व व्यायाम केल्यास तुम्ही वजनावर नियंत्रण ठेवू शकतात.

Leave a Comment

Exit mobile version