काही कारणास्तव वेतन थकीत राहिल्यानंतर ते काढणे म्हणजे तारेवरची कसरत होती.थकीत बिल काढताना अनेक महिने लागत होते व बिल ट्रेझरी ला आले की ते मंजूर करण्यासाठी दहा ते वीस टक्के पर्यंत काही दलाल पैशाची मागणी करत होते यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत होते.
यापुढे आता सर्वांचे थकीत वेतने हे शालार्थ प्रणाली द्वारे ऑनलाइन होणार असून त्यामुळे शिक्षकाचे आर्थिक नुकसान होणार नाही व ते बिल लवकरात लवकर शिक्षकांच्या थेट अकाउंट मध्ये जमा होणार आहे.
असे पत्रक
शरद गोसावी (शिक्षण संचालक प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांनी
श्री पवन जोशी,प्रकल्प प्रमुख, महाआयटी, मुंबई.प्राथमिक शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे 411001 यांना पाठवले आहे.
त्या पत्रात खालील सूचना नमूद केलेले आहे.
क्र. प्रसिसम/2023-24/अंदाज-201/00397 दिनांक- 12/01/2024.
विषय :- जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या व शाळा प्रणालीत खाजगी अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकबाकी व इतर देयके ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
वरील बाबींच्या संदर्भात खालील मुद्यांच्या अनुषंगाने शाळा प्रणालीमध्ये ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देणे.
थकीत वेतन
1. देय देयके – खाजगी शाळांच्या बाबतीत संचालनालय स्तरावरून प्रशासकीयरित्या मंजूर केलेली देयके, जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत जिल्हास्तरीय सक्षम प्राधिकारी जसे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सर्व सर्वसाधारण सभा इ. मंजूर प्रशासकीय आदेशानुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात थकबाकी ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
CMP Pranali
2. त्याच आर्थिक वर्षात अंशत: अनुदानित शाळेतील 20 टक्के, 40 टक्के अनुदानाची पुढील वेतनवाढ झाली असेल आणि या वाढीव हप्त्याचा फरक अद्याप अदा करायचा असेल, तर तो फरक गृहीत धरून भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. फरक ऑनलाइन भरताना थकबाकी.
3. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा 2रा आणि 3रा हप्ता आणि इतर थकबाकी ऑनलाइन पेमेंट प्रणालीद्वारे भरण्याची सुविधा प्रदान करण्यात यावी.
CMP प्रणाली द्वारे होणार शिक्षकांचे पगार अधिक माहीती साठी येथे Click करा
शालार्थ प्रणाली
4. आर्थिक वर्ष 2023-24 च्या थकबाकीसाठी प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे शाळा प्रणाली ऑनलाइन सुविधा प्रदान करण्यात यावी. पुढील वर्षापासूनची थकबाकी डीडीओ 1, डीडीओ 2, डीडीओ 3 चॅनेलद्वारे ऑनलाइन सुविधा द्यावी.
Teachers salary
5. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनाची स्वीकार्य थकबाकी अदा करताना काही थकबाकी पूर्व तपासणीअभावी चुकीच्या पद्धतीने मोजल्या गेल्यास शाळा प्रणालीमध्ये Adit पर्याय DDO-1 देण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
School Teacher
6.4/11/2024 च्या शासन निर्णयानुसार, शालार्थ प्रणालीद्वारे वेतन आणि भत्त्यांची तरतूद शालार्थ प्रणालीमध्ये थेट कर्मचार्यांच्या बँक खात्यात स्टेट बँक ऑफ इंडिया CMP (कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट) ई-कुबेर प्रणालीद्वारे केली जावी.
1 thought on “आता सर्व थकीत वेतन देयके होतील शालार्थ प्रणाली द्वारे….”