गेल्या वर्षी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ केली होती त्यानंतर महागाई भत्ता (DA) चा दर 42 वरून 46 टक्क्यावर गेला. आता 1 जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार ते पाच टक्के वाढ होऊन तो 50 टक्क्याच्या वर जाण्याची शक्यता आहे.
Eighth Pay Commission Demand
8th Pay Commission! यामुळे 8 व्या वेतन आयोगाच्या मागणी जोर पकडू लागली आहे व विविध संघटनाकडून मागणी होताना दिसत आहे
नॅशनल कौन्सिल ऑफ स्टाफ साईडचे सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनचे सरचिटणीस सी. श्रीकुमार म्हणतात कर्मचाऱ्यांसाठी ठेचा सध्याचा दर 46 टक्के आहे जानेवारी 2024 पासून जेव्हा हा दर चार ते पाच टक्क्यांनी वाढेल तेव्हा तो आकडा पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असेल यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा प्रस्ताव केंद्र सरकार समोर जोरदारपणे ठेवण्यात येणार आहे त्यासाठी कर्मचारी संघटना सरकार विरुद्ध संघर्ष करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आठव्या वेतन आयोगाची स्थापना होण्यास किंवा त्यास मान्यता मिळण्याच्या अशा पल्लवीत झालेले आहे.
निर्देशांक 139.1 अंकाच्या पातळीवर संकलित
भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या लेबर ब्युरो ने 31 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या नोव्हेंबर 2023 च्या अखिल भारतीय सीपीआय-आय डब्ल्यू मध्ये 0.7 अंकाची वाढ नोंदविण्यात आली आहे औद्योगिक कामगारांच्या ग्राहक किंमत निर्देशांक आता 139.1 वर पोहोचला आहे त्या आधारे जानेवारी 2024 पासून अपेक्षित डि ए (DA )4 ते 5 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
जानेवारी 2024 पासून अपेक्षित डी ए/ डी आर 50 टक्के पर्यंत वाढेल कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे सलग्न कार्यालय लेबर ब्युरो देशभरात पसरलेल्या 88 महत्त्वाच्या औद्योगिक केंद्रातील 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किमतीच्या आधारे दर महिन्याला औद्योगिक कामगारासाठी किंमत निर्देशांक तयार करते हा निर्देशांक 88 औद्योगिक केंद्रे आणि अखिल भारतीय केंद्रासाठी संकलित करण्यात आला आहे पुढील महिन्याच्या शेवटी कामाच्या दिवशी हे संकलन प्रसिद्ध केले जाते.
डिसेंबर 2023 चा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आय डब्ल्यू) 0.7 अंकांनी वाढवून 139.1 अंकावर पोहोचला आहे गेल्या महिन्याच्या तुलनेत निर्देशांक 0.51 टक्क्यांनी बदलला वर्षभरापूर्वी याच दोन महिन्यात निरीक्षण 0.23 वर स्थिर होता.
यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारामध्ये घसघशीत वाढ मिळणार आहे