वजन कमी करण्याठी महत्वाचे ५ योग – वजन कमी करण्यासाठी योगासने-Yoga

वाढलेले वजनाची समस्या 

बदलत्या लाईफस्टाईल मुळे वजन बेसुमार वाढणे ही आजकाल मध्ये ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक तरुण व तरुणी  आपला कितीक वेळ जिम मध्ये घालवत असतात. वजन कमी करण्यासाठी कठीण डाएट प्लॅन फॉलो करत असतात. पण तरीही त्यांनी ठरवलेले वजन कमी होत नाही किंवा त्यास खूप वेळ लागतो खरं बघितलं तर वजन कमी करण्यासाठी संतुलित डायट आणि काही एक्सरसाइज फॉलो केल्याने आपले वजन आटोक्यात येते. वजन कमी करण्यासाठी योगा हा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे जर कधी आपण दररोज नियमित स्वरूपात योगा केला तर पोटावर जमा झालेली चरबी कमी होऊन, आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी खाली दिलेले 5 योगासने आपण दररोज केली पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी व अधिक माहीती साठी येथे Click करा.

yoga

योगा करण्याचे फायदे

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये योगाला फार महत्त्वाचे स्थान दिलेले आहेत. ऋषीमुनी पासून आज पर्यंत योगा नियमत पद्धतीने केला जातो. योगाच्या नियमित सरावामुळे आपल्या शरीराला फार मोठे फायदे होतात.
आपले शरीर सर्व स्तरावर तंदुरुस्त राहून आपली काम करण्याची क्षमता वाढते. यामुळे आपण आपले करिअरमध्ये एका विशिष्ट उंचीवर पोहोचू शकतो.

वजन नियंत्रण – Weight Control

योगामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर तंदुरुस्त होते मॉडन लाईफस्टाईल मुळे आपल्या शरीराची झालेली हानी व त्यामुळे वाढलेले वजन हे योगा केल्याने कमी होतात. योगामुळे शुगर बद्धकोष्ठता यासारखे आजाराशी लढण्यास ही मदत होते. काही वेळेस लोकांना असे वाटते की योगा केवळ शरीर लवचिक बनविण्यासाठी केला जातो परंतु तसे नाही योगामध्ये अनेक असणे आहेत ज्यामुळे वेगवेगळे फायदे होत असतात योगाच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि निरोगी राहू शकता. योगा केल्याने आपले मन शांत राहते आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

वजन कमी करण्यासाठी योगासने

yoga for weight loss

योगासन

नटराजासन natarajasana

नटराजानसन हे आसन अवघड योगासने मध्ये मोडते. पूर्वी  पासून अशी मान्यता आहे की हे योगासन भगवान शंकराला खूप आवडायचे, तर जाणून घेऊया नटराजन या आसनाचे फायदे आणि करण्याची पद्धत

नटराजासन natarajasana :  या आसनामुळे मांडीच्या आतील आणि बाहेरील भागाच्या व्यायाम होतो यामुळे तुमच्या पोटापासून ते तुमच्या पायापर्यंत पायाच्या प्रत्येक नवीन तोंड होतात हे असं करण्यासाठी सरळ उभे राहा उजवा पाय मांगे वाकवा आणि डाव्या हाताने पायाच्या घोट्याला धरा पाय शक्य तितक्या उंच नेण्याचा प्रयत्न करा आपला उजवा हात सरळ समोर ठेवा दीर्घ श्वास घ्या आणि शरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करा काही काळ या स्थितीत रहा त्यानंतर सरळ स्थितीत या आणि दुसऱ्या हाताने आणि पायाने हे आसन करा.

नटराजासन (natarajasana)

नटराजासन (Natarajasana) – मराठी विश्वकोश

———————————————————————-

वजन कमी करण्यासाठी योगासने

वीरभद्रासन (virbhadrasana)

या आसनाला योद्धा पोज असेही म्हणतात. या आसनामुळे खांदे हात मांड्या आणि पाठीच्या स्नायूंना ताकद मिळते.

सर्वप्रथम ताडासन च्या स्थितीमध्ये उभे रहा
तुम्ही तुमचे दोन्ही हात वर करताना तुमचे खांदे खाली ठेवा आणि तुमची मान सरळ ठेवा जेणेकरून ते जमिनीच्या समांतर असतील.

श्वास सोडा आणि तुमचा उजवा गुडगावातवा तो तुमच्या घोट्यावर ठेवा पोज मध्ये स्थिरता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असल्यास आपले पाय किंचित हलवा.

(आपल्या पायामध्ये साधारण तीन ते चार फुटाचे अंतर ठेवून उभे राहा. दोन्ही हात पसरवा हाताची तळवे वरच्या बाजूला ठेवा डोकं आणि उजवा पाय उजवीकडे नेत दुसऱ्या पायाचा गुडघा काटकोनात दुमडा थोडा वेळ या स्थितीत रहा नंतर श्वास घेत पुन्हा सरळ उभे रहा आता हेच आसन डाव्या बाजूने करा.)

                           वीरभद्रासन (virbhadrasana) 

———————————————————————-

वजन कमी करण्यासाठी हिंदीतून अधिक माहीती साठी येथे Click करा

Yoga

उत्कटासन(Utktasana)

या आसनामुळे पाठीचा कणा आणि छातीच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो. पाठीच्या खालच्या भाग मजबूत होतो.
मांड्या, टाच, पाय आणि गुडघ्याच्या स्नायूंना बळ मिळते शरीराचे संतुलन आणि मानसिक शक्ती वाढते.

उत्कटासनला खुर्ची पोज असेही म्हणतात. हे आसन  करण्यास सोपे आहे. हे आसन पाय, पृष्ठभाग आणि मांड्या यांच्या स्नायूवर काम करते.

आसन करण्याची पद्धत

सर्वप्रथम तळहात जमिनीकडे असतील अशा रीतीने हात खांद्याच्या रेषेत सरळ वर उचला. हात कोपरात वाकू नका. गुडघे वाकून आपल्या ओटीपोटात वाका आपण एका खुर्चीवर बसलो आहोत अशी कल्पना करा. तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित करा. काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर सरळ उभे रहा.

उत्कटासन(Utktasana)

utkatasana in hindi

———————————————————————-

योगासने

जानू शीर्षासन (Janu sirsasana)

या आसनामुळे पाठीच्या मागच्या बाजूचा व्यायाम होतो, त्याचबरोबर खांदा आणि पोटाचा व्यायाम होतो. जानू शीर्षासनमुळे लवचिकता वाढण्याबरोबरच शरीराचा पृष्ठभाग आणि मांडीचे सांधे मजबूत होतात.

हे आसन करण्याची पद्धत

सर्वप्रथम समोर सरळ पाय पसरून बसा पाठीचा कणा सरळ ठेवा.
डावा गुडघा  वाकवा डाव्या पायाचा तळवा उजव्या मांडीजवळ ठेवा आणि डावा गुडघा जमिनीवर ठेवा.
श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर उचला त्यांना खेचा आणि कंबर उजवीकडे फिरवा.
श्वास सोडताना पाठीचा कणा सरळ ठेवून नितंबा पासून पुढे वाकून हनुवटी बोटाच्या वाका.
शक्य असल्यास तुमच्या पायाची बोटे धरा कोपर जमिनीवर लावा आणि बोटे ओढून धरा.
या स्थितीमध्ये थांबून श्वास रोखून धरा.
श्वास घ्या श्वास सोडा आणि  उजव्या पायांनी संपूर्ण प्रक्रिया  पुन्हा पूर्ण करा.

थोडक्यात आसन करण्याची पद्धत :  (आसन करण्यासाठी समोरच्या जमिनीवर बसा. दिशेने पाय पसरवा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्या. उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीजवळ ठेवा. श्वास घ्या, श्वास सोडताना पुढच्या बाजूने वाकत डाव्या पायाच्या तळव्याला स्पर्श करा. थोडा वेळ या स्थितीत थांबा. आता दुसऱ्या बाजूने हे आसन करा.)

                         जानू शीर्षासन (Janu sirsasana)

Benefits and Right Way To Do Janu Sirsasana Explained by Yoga Expert in Hindi | जानुशीर्षासन करने के शरीर को होते हैं कई फायदे, योगा एक्सपर्ट से जानें इस आसन को करने

————————————————————————————

उपविष्ठ कोणासन (Upavistha Konasana)

उपविष्ठ कोणासनचे फायदे:

चिंता आणि तणाव कमी होते,बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत मिळते, बसण्याच्या आणि उभे राहण्याच्या मुद्रेमध्ये सुधारणा होते. हे आसन मांड्याचे स्नायू मजबूत करत ताकद आणि लवचिकता देखील वाढवते.

पाय आपले समोरच्या बाजूला पसरावा. यानंतर तुमचे तळवे मध्यभागी आणा. आता पाय हाताच्या बाजूला शक्य तितक्या लांब पसरावा. तुमच्या शरीराचा पुढच्या बाजूने वाका. तुमची हनुवटी आणि डोके जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

उपविष्ठ कोणासन (Upavistha Konasana) आसन करण्याची पद्धत:

सर्वप्रथम  आपले पाय समोरच्या बाजूला पसरावा. यानंतर तुमचे तळवे मध्यभागी आणा. आता पाय हाताच्या बाजूला शक्य तितक्या लांब पसरावा. तुमच्या शरीराचा पुढच्या बाजूने वाका. तुमची हनुवटी आणि डोके जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

                      उपविष्ठ कोणासन (Upavistha Konasana)

Upavistha Konasana (wide-angle seated forward bend)

———————————————————————————————————————-

1 thought on “वजन कमी करण्याठी महत्वाचे ५ योग – वजन कमी करण्यासाठी योगासने-Yoga”

Leave a Comment