श्री व्यंकटेश पब्लिक स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन….

श्री व्यंकटेश पब्लिक स्कूल, बीड बायपास रोड, अरुणोदय कॉलनी, छत्रपती संभाजीनगर. या शाळेमध्ये  मध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन आज दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले. क्रीडा सप्ताहाच्या  आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव तथा श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री किरण पाटील साहेब होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ चिकलठाणा चे अध्यक्ष तथा श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय श्री राजेश पाटील साहेब व हिवराळे साहेब निवृत्त पोलीस सतारा, साबळे साहेब, श्रीनिवास भंडारी साहेब , सोनवणे साहेब व श्री व्यंकटेश पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापक श्री वाघ सर होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सागताना खेळ  खेळल्याने आत्मविश्वास वाढतो , संतुलित वजन राखून निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढते, सामाजिक कौशल्ये सुधारतात. खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते, निरोगी व्यक्ती किंवा खेळाडू हे निरोगी समाज घडवतात आणि निरोगी समाज निरोगी देश बनवतो. प्रत्येक व्यक्तीने दररोज शक्य तितके मैदानी खेळ  खेळले पाहिजेत. तसेच अध्यक्ष महोदयांनी  चांगल्या सवयी याबद्दल मार्गदर्शन केले.

आज झालेल्या स्पर्धां

01) लिंबू चमचा

लिंबू चमचा स्पर्धेमध्ये वर्ग पाचवी ते  सातवी या गटामध्ये मुलांमधून राज आदमाने  याने प्रथम क्रमांक पटकवला आणि
मुलींमधून वैष्णवी बाहेती हिने प्रथम क्रमाक पटकवला तर  ऐश्वर्या राठोड  हिने द्वितीय क्रमांक पटकवला.
या विद्यार्थ्यांनी नंबर पटकावले.

वर्ग आठवी ते दहावी या गटामध्ये  मुलामधून सुरज घोडके याने प्रथम क्रमांक पटकावला तर अमर जोगदंड या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला .

02) धावण्याची शर्यत

धावण्याच्या शर्यत मध्ये वर्ग पाचवी ते  सातवी या  गटामधून मुलांमधून केतन शेळके याने प्रथम क्रमांक पटकवला,सोहम वाकळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर मुसेब पटेल या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला.

मुलींमधून आरशी पटेल हिने प्रथम क्रमाक पटकवला, आर्या भंडारी  हिने द्वितीय क्रमांक पटकवला, तर दिव्या बांगर हिने तृतीय क्रमांक पटकावला.

वर्ग आठवी ते दहावी या गटामध्ये  मुलामधून रोहित बोंगाणे  याने प्रथम क्रमांक पटकावला, सुयश राठोड  या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर  ओम वाघ या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला.

03) पोत्याची रेस

पोत्याची रेस या स्पर्धेमध्ये वर्ग पाचवी ते  सातवी या  गटामधून मुलांमधून शुभम घूले  याने प्रथम क्रमांक पटकवला,मुसेब पटेल या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला
मुलींमधून आरशी पटेल हिने प्रथम क्रमाक पटकवला, आर्या भंडारी  हिने द्वितीय क्रमांक पटकवला, तर दिव्या बांगर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
वर्ग आठवी ते दहावी या गटामध्ये  मुलामधून अविनाश निकम   याने प्रथम क्रमांक पटकावला, किशोर मुंढे  या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

लंगडी ची स्पर्धा

लंगडी या स्पर्धेमध्ये वर्ग पाचवी ते  सातवी या  गटामधून मुलांमधून केतन शेळके   याने प्रथम क्रमांक पटकवला,कार्तिक जकाते  या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
मुलींमधून आरशी पटेल हिने प्रथम क्रमाक पटकवला, स्नेहल राठोड   हिने द्वितीय क्रमांक पटकवला.

वर्ग आठवी ते दहावी या गटामध्ये  मुलामधून बालाजी जौक    याने प्रथम क्रमांक पटकावला, किशोर मुंढे  या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

वर्ग आठवी ते दहावी या गटामध्ये  मुली मधून मानसी बुरुकुल  हिने  प्रथम क्रमांक पटकावला, प्रांजल शेळके   या विद्यार्थ्यांनीनी द्वितीय क्रमांक पटकावला.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्याने कौतुक करून त्यांना बक्षीस दिले .

 

Leave a Comment