शासकीय / नीमशासकीय अधिकारी/ कर्मचारी यांच्या वेतन बँक खात्याशी संलग्न अशा अपघात विमा विषयक लाभ आधारित योजना विविध बॅंकाकडून राबिण्यात येत आहेत. वेतन खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक विविध योजना अंतर्गत अधिकारी/ कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायद्याच्या आहेत. त्याकरिता बँकांकडून कोणतेही वेगळे शुल्क आकारले जात नाही त्यामुळे काही राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज (SGSP) अंतर्गत विमा योजनेचा लाभ मिळवण्यासंदर्भात अधिकारी /कर्मचारी यांना वित्त विभागांनी शासन परिपत्रक दिनांक08-10-2820 अन्वये अवगत केलेले आहे.
त्या अनुषंगाने वित्त विभागाच्या दिनांक 08-10-2020 च्या परिपत्रकांनवे राष्ट्रीयकृत बँकांकडून प्राप्त स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेज(SGSP) अंतर्गत अपघात विमा योजनेच्या विविध लाभाबाबत माहिती दिलेली आहे. सदर माहिती खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात आणण्यात येत आहे या अनुषंगाने मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँकेत किंवा कोअर बँकिंग असलेल्या अन्य बँकेत उघडण्याची स्वातंत्र्य राहील.
शिक्षकांचे पगार होणार त्यांच्या आवडीच्या बँक खात्यात
◼️खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातिल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बँकेत करणे बाबत,सदर शासन निर्णय नुसार कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन बँक खाते त्यांचे इच्छेनुसार बँक निवडीचा अधिकार – शालेय शिक्षण विभाग परिपत्रक -दिनांक -19 डिसेंबर 2023◼️
या निर्णयामुळे शिक्षकांना त्यांचे आवडीच्या बँक मध्ये अकाउंट खोलण्याची मुभा मिळेल.