Ration Card-ऑनलाइन अर्ज करा तीस दिवसात रेशन कार्ड!!!

तुमच्याकडे Ration Card नाहीये?; काळजी करू नका, घर बसल्याही बनवता येणार - Marathi News | Dont have a ration no need to worry you can apply online for ration card check step

Ration Card-ऑनलाइन अर्ज करा तीस दिवसात रेशन कार्ड!!!

नावे कमी अथवा वाढविण्याची ही सोय मोबाईल नंबर लिंक केल्यास दरमहा येईल मेसेज!

apply online Ration Card

 

रेशन कार्ड साठी एजंट कडे पैसे व कागदपत्रे दिली पण महिन्यानंतर ही शिधापत्रिका मिळालीच नाही. अशा तक्रारींना आता कायमचा पूर्णविराम लागणार आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नागरिकांना ऑनलाईन रेशन कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे बनावट गिरीला हिचा बसला आहे आपले सरकार सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत 50 ते 100 रुपयांच्या शुल्कात त्यासाठी अर्ज ऑनलाईन अपलोड केला जाईल त्यानंतर अवघ्या तीस दिवसात संबंधित व्यक्तीला रेशन कार्ड मिळणार आहे. त्यामुळे दुबार किंवा विभक्त रेशन कार्ड त्यातील नावे कमी करणे किंवा नावे वाढविणे नवीन रेशन कार्ड काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांची डिजिटल स्वाक्षरी येईल. त्यानंतर त्या लाभार्थीला रेशन कार्ड मिळणार आहे कोणत्याही एजंट कडे जाऊन त्याला पैसे देण्याची गरज या सुविधेमुळे राहिलेली नाही. नागरिकांना आता शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची आवश्यकता नाही घरबसल्या त्यांना शिधापत्रिका मिळणार आहेत.

Online Ration Card-ऑनलाइन शिधापत्रिका

या संकेतस्थळावरून करा अर्ज अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्णयानुसार आता गावातील शहरातील प्रत्येक नागरिकांना ऑनलाइन शिधापत्रिका मिळणार आहे. त्यासाठी त्यांना जवळील ऑनलाइन सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन www.Rcms.mahafood.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे.

मोबाईलवर येईल मराठीतून मेसेज

प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा आधार क्रमांक आता लिंक करण्यात आला आहे. अंत्योदय योजनेतील कुटुंबाला दरमहा 35 किलो तर प्राधान्य कुटुंबाला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जाते केंद्र व राज्य सरकारने हे प्रमाण निश्चित केले आहे दरम्यान कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीने त्याचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिका लिंक केल्यास धान्य घेतल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळातच त्यासंबंधीचा मेसेज मराठीतून आपल्या मोबाईलवर येणार आहे त्यातून धान्य मिळाले नसल्याचा तक्रारी कमी होतील असा विश्वास विभागाला आहे.

शिधापत्रिका काढण्यासाठी आता कोणाकडेही जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन सुविधा केंद्रावरून अर्ज केल्यास तीस दिवसात त्या व्यक्तीला नवीन रेशन कार्ड किंवा विभक्त रेशन कार्ड मिळणार आहे.

अन्नधान्य वितरण अधिकारी

2 thoughts on “Ration Card-ऑनलाइन अर्ज करा तीस दिवसात रेशन कार्ड!!!”

  1. नविन रेशनकार्ड मिळाले आहे पण ते धान्य मिळत नाही. ऑनलाईन करून मिळत नाही तहसिल मध्ये बरेच वेळा जाऊन आलो आहोत . काही उपाय असल्यास सांगा.

    Reply

Leave a Comment