पेन्शनमध्ये अखेर वाढ; वृद्धांना मिळाला आधार
१ जानेवारी २०२४ पासून लागू होणार वाढ
राज्य सरकारने वयाची ८० वर्षे पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता दिली होती.
Pension
राज्य सरकारच्या निर्णयानुसार, १ जानेवारी २०२४ पासून ही वाढ लागू होणार आहे. तत्पूर्वी वयोमानानुसार वाढीव निवृत्तिवेतन घेत असलेल्या निवृत्तिवेतनधारक/ कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सुधारित दरानुसार फरकाची रक्कम देय नसेल. याचा अर्थ निवृत्तिवेतनातील वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू आहे असे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी, शासन मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठांमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही वाढ लागू राहील, असे शासन निर्णयात म्हटले आहे. या निर्णया मुळे ज्यांनी आपल्या आयुष्याची सर्व वर्ष जनसेवेत दिली त्यांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
आता सर्व थकीत वेतन देयके होतील शालार्थ प्रणाली द्वारे अधिक माहीती साठी येथे Click करा
सदर बदल हा १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे. व तो खालील प्रमाणे लागू राहील
1 |
वय वर्ष 80ते 85 | मुळ निव्रतीवेतनात 20% वाढ |
2 |
वय वर्ष 85पेक्षा अधिक ते 90वर्ष | मुळ निव्रतीवेतनात 30% वाढ |
3 | वय वर्ष 90 पेक्षा अधिक ते 95वर्ष |
मुळ निव्रतीवेतनात 40% वाढ |
4 | वय वर्ष 95पेक्षा अधिक ते 100 वर्ष |
मुळ निव्रतीवेतनात 50% वाढ |
5 | वय वर्ष 100पेक्षा अधिक |
मुळ निव्रतीवेतनात 100% वाढ |
आठवां वेतन आयोग एवं महंगाई भत्ता के अधिक जानकारी के लिये यहा Click करे
आठवा वेतन आयोग आणी महागाई भत्ता च्या अधिक माहीती साठी Click करा