मराठवाडा – दुष्काळवाडा

  • यावर्षी मराठवाडा मधील दुष्काळाची गंभीर परिस्थिती उभी राहिलेली आहे. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाऊस सरासरी पेक्षा खूपच कमी पडल्याने शेतकऱ्यांचे उभे असलेले पिके हे जळून गेले व जे जगले त्यांच्यावरती रोगांचा भडिमार झालेला होता तसेच त्याच्यातून जे राहिले त्या पिकांचे अतिवृष्टीने राहिलेले नुकसान करून टाकले

 

यामुळे शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे.

 

 

छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड या ठिकाणची दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व चाऱ्यासाठी चारा छावणी उभ्या करण्याची मागणी स्थानिक स्तरातून होत आहे.

 

यावर्षी शेतकऱ्यांचा खर्च शंभर टक्के होऊन उत्पन्न निम्म्यावर आल्याने व तसेच त्या उत्पादनाला भाव नसल्याने शेतकऱ्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे

 

हिवाळी अधिवेशन होऊन गेले परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही व कोणतीही मदत घोषित झाले नाही यावरती विरोधी पक्ष ही कोणताही आवाज उठवायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या विरुद्ध नाराजी पसरत आहेत.

Leave a Comment