संक्रांत म्हणजे काय
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रात म्हटले जाते.
Makar Sankrant – मकर संक्रांत
मकर संक्रांत का साजरी केली जाते
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांती पासून दुसऱ्या संक्रांति पर्यंतचा काळ हा सोर मास (महिना) म्हणून ओळखला जातो. पोष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. मकर संक्रांति हा सण उत्तर भारतात दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. असे मानले जाते की संक्रांती पासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दाणा पेक्षा श्रेष्ठ असते. मकर संक्रांतीच्या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्ष प्राप्ती होते. मकर संक्रांति पासून सूर्य उत्तरायण होतो. म्हणून हा दिवस लोक आनंद उत्साहात साजरा करतात.
———————————————————————
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्य देवांच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांति अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद, इ. घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांना या परवाचे स्वागत केले जाते.
मकर संक्रांत के बारे में अधिक जानकारी के लिये यहा Click करे
किंक्रात म्हणजे काय
संक्रांतीच्या दुसऱ्या दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा करतात. संक्रांति देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंग करा सुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाच्यातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो जातो. पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही. या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभ साजरा करतात.
———————————————————————
मुलांचे बोर न्हान का करतात
मकर संक्रांति ते रथसप्तमीच्या काळात तान्या बाळाचे तसेच पाच वर्षापर्यंतच्या मुलांचे बोर न्हांन केले जाते. बोर न्हान हा एक शिशु संस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानांशी जुळवून घेत साजरा केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कार बरोबर शिशुच्या आरोग्याची उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींचा समावेश केला जातो. अगदीच तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणे अशक्य आहे म्हणून पाच वर्षापर्यंत मुलांचे बोरन्हान केले जाते. न कळल्या वयापासून कळत्यावयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी, परंपरेशी निसर्गाची नाळ जोडली जाते.
मकर संक्रांतीच्या अधिक माहीती साठी येथे Click करा
———————————————————————
सूर्यनारायनचे उपवास का करावे
Suryanarayan Upawas
देवी पुराणानुसार शनि महाराजांचे त्यांच्या वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्यांची आई छायाला त्यांच्या दुसऱ्या बायकोचा सज्ञाचा मुलगा यम राजाशी भेदभाव करताना पाहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने सज्ञा आणि त्यांचा मुलगा शनि यांला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनि व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोगाचा श्राप दिला होता. यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनि महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनि देवाची राशी मानले जाते ती जाऊन टाकली. म्हणून शनि व त्याची आई छाया हिला हालअपेष्टा सहन करावी लागली. यम राजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला त्रासात असलेला पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्य देवाला समजवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की, शनि जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धन धान्यांनी भरून असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की, मकर संक्रांतीला जे कोणी सूर्य देवाची पूजा करतील त्यांना शनि दिशेचे त्रास सहन करावे लागणार नाही. म्हणून संक्रांति पासून ते रथसप्तमी पर्यंत दर रविवारी सूर्यनारायणाचे उपवास केले जाते.
1 thought on “मकर संक्रांत – Makar Sankrant”