Maharashtra havaman: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज! वाचा तुमच्या जिल्ह्यात पडेल का पाऊस?

महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश ढगाळ झाले असून राज्यातील कोल्हापूर सारख्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी देखील लावली आहे.संपूर्ण राज्यांमध्ये थंडीचा कडाका असून काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे.

An umbrella under heavy rain

काही जिल्ह्यांमध्ये थंडी वाढलेली आहे तर काही ठिकाणी वातावरणातील गारठा कमी झाल्याचे सद्यस्थिती आहे. तसेच बरेच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर धुके दिसून येत असल्याचे देखील सध्या चित्र आहे. काल राज्याच्या काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या.

म्हणजेच काही ठिकाणी ढगाळ हवामान मात्र काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी अस संमिश्र हवामान सध्या दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील काही ठिकाणी विजांचा हलका पाऊस तर काही ठिकाणी तूरळक पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान विभागाच्या माध्यमातून जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. तसेच या भागांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

उद्या देखील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील नगर जिल्ह्यामध्ये रविवार आणि सोमवारी देखील काही भागांमध्ये पावसाच्या हलके सरी पडतील असा अंदाज आहे व त्यासोबतच रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच रत्नागिरी व धुळे जिल्ह्यात देखील शनिवार आणि सोमवारी काही ठिकाणी हलका पाऊस पडेल व नाशिक जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार तर पुणे जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवार व कोल्हापूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Leave a Comment