लिंबू पाणी पिण्याचे महत्वाचे 10 फायदे

लिंबू ला अमृत म्हटले जाते. लिंबू हा ‘व्हिटॅमिन सी’ चा महत्वपूर्ण स्रोत मानला जातो. आयुर्वेदानुसार लिंबाला रोजच्या आहारात समावेश केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. उलटी होणे, अपचन, आंबट ढेकर यांसारख्या पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून एक कप पाण्यात लिंबाचा रस, साखर आणि थोडंसं मीठ घालून प्यायल्यास आराम मिळू शकतो. म्हणून लिंबाला अनन्यसाधारण महत्व आहे. लिंबू चे महत्वपूर्ण फायदे खाली दिलेले आहे.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

1) उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते. शरीराला hydrated ठेवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी नक्की प्यावे. म्हणून लिंबू पाणी रोज पिले पाहिजे. तसेच लिंबू पाणी रोज सकाळी वापरल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होऊ शकते.

लिंबू चे गुणधर्म कोणते

2) त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, वाढते वय कमी करण्यासाठी दररोज लिंबू पाणी प्यावे. लिंबातील anti-oxidants वाढत्या वयाची लक्षणे कमी करतात, त्वचेवर निखार आणतात. त्यामुळे चेहरा ताजा तवाणा राहण्यासाठी चेहऱ्यावर लिंबुचा रस लावला जातो. चेहऱ्यासाठी लिंबूचा रस ऐक वरदान आहे.3) लींबुचा महत्वाचा फायदा म्हणजे ते रक्तातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी लिंबू पाणी फायदेशीर आहे.त्यामुळे आहारामध्ये नियमित लिंबू चा उपयोग केला पाहिजे.नींबू पाणी आपल्या मूडला हलकं आणि शरीराला एनर्जेटीक बनवून ठेवण्यासाठी मदत होते.

 

लिंबू पाणी

4) लिंबूपाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत चालते पोटात गॅस होणे, पोट फुगणे, छातीत जळजळ होणे यासारखे त्रास होत नाही. यामुळे ज्यांची पचनक्रिया खराब असेल किंवा ज्यांना पोटाचा त्रास असेल त्यांनी लिंबू चे आधीक सेवन केले पाहिजे. तसेच अतिसार (diaria) झाल्यास वारंवार टॉयलेटला जावे लागते. मन पातळ होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी लिंबू पाणी मीठ टाकून प्या फायदा होईल.

5) नियमित लिंबू पाणी प्यायल्याने वजन नियंत्रित राहते .वजन नियंत्रित राहण्यासाठी लिंबुचे सेवन महत्त्वाचे आहे तसेच कर्करोगापासून बचाव होतो.

लिंबू सत्व

6) ज्या व्यक्ती चे वजन वाढलेले आहे. त्यांनी वजन नियंत्रित राहण्यासाठी दररोज सकाळी अन्नशापोटी कोमट पाण्यात लिंबू व मध टाकून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

7) आजारांपासून लढण्यासाठी लिंबू फार महत्वाचे आहे. लिंबातील vitamin-c रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. परिणामी सर्दी, खोकला यासारखे आजार होत नाही. तसेच लिंबू मध्ये थियामीन, नया सीन, रिबो फ्लोविन, विटामिन बी-6, विटामिन ई आणि फोलेट सारखे विटामिन राहतात.

lemon juice

8) सतत चिंता ग्रस्त असलेले व्यक्ती तथा डिप्रेशन मध्ये गेलेल्यानी दररोज लिंबू पाणी पिण्याने मनावर आलेले ताण (stress) हलका करते. मानसिक ताण काळजी, चिंता, डिप्रेशन या सर्वांवर लिंबू पाणी फायदेशीर ठरते.लिंबू पाणी पिल्यानंतर इम्यूनिटी पावर मजबूत बनवू शकते.

लिंबू खाण्याचे फायदे

9) लिंबू पाणी दररोज प्यायल्याने मुतखडा होत नाही. मुतखडा झालेल्या व्यक्तींना लिंबू पाणी भरपूर प्रमाणात पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मधुमेह(diabetes) असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाण्याचे सेवन आवर्जून करावे . लिंबू पाणी शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे काम करते.

10) घसा दुखत असेल किंवा गळा खराब झाला असेल तर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या आराम पडेल.तसेच हिरड्यातून रक्त येणे हिरड्या सुजणे यामध्ये लिंबू पाण्यात थोडेसे मीठ टाकून प्या आराम मिळेल.

 

गरम पाणी पिण्याचे 10 महत्वाचे फायद्याच्या माहीती साठी येथे Click करा

1 thought on “लिंबू पाणी पिण्याचे महत्वाचे 10 फायदे”

Leave a Comment