जिजाऊ होत्या म्हणून घडले शिवराय:शिवबांना स्वराज्य स्थापनेचे बाळकडू पाजणाऱ्या राजमाता, जाणून घ्या जीवनप्रवास.
शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात प्रजेचे हाल सुरू होते. सातत्याने मुघलांची आक्रमणे होत असत. या य़ुद्धाची झळ ही प्रजेला अधिक बसत होती. पिकाने बहरेली शेतजमीन उद्धवस्त होत होती. मात्र शिव जन्मानंतर हे चित्र हळूहळू पटलू लागले.
राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल कोणाला काही माहीत नाही असे कधीच होऊ शकणार नाही ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाही तर ते सत्य तू उतरवण्यासाठी अनेक पराकाष्टा केली त्या म्हणजे मासाहेब जिजाऊ होय भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदिशक्तीचे वर्णन दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले मा साहेबांचा उल्लेख करताना आपल्या आपल्याला कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.
Rajmata Jijabai: आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता राजमाता जिजाऊ यांची तारखेनुसार 425 वी जयंती आहे.
राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारले, मात्र त्यासाठी त्यांना मॉं साहेब जिजाऊ यांनी प्रेरित केले. जिजाऊंनीच त्यांना स्वराज्याची वाट दाखवली. याच प्रेरणेमुळे स्वराज्याचा पाया रचला गेला.
जिजाऊंच्या संस्कारात शिवाजी महाराजांचे संगोपन झाले आणि यातूनच त्यांना आपल्या दीनदुबळ्या शोषीत कष्टकरी प्रजेसाठी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लघुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते.
जिजाऊंना चार भाऊ होते. दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे जिजाऊंच्या भावांची नावे होती. जिजाऊ दांडपट्टा आणि अश्वारोहण या युद्ध कलांमध्ये पारंगत होत्या. डिसेंबर 1605 मध्ये त्यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे झाला.
शहाजी राजे निजामशाहीचे सरदार होते. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाऊंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली तर दोन मुले होती. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले.
शिवबांना त्यांनी लहानपणीच रामायण, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या.त्याचबरोबर जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज युद्ध कला शिकले.गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे ही आऊंसाहेबांची इच्छा होती. 23 जानेवारी 1664 साली शहाजी राजे यांचे देखील निधन झाले.
मात्र पतीच्या निधनानंतर देखील जिजाऊंनी हार मानली नाही. त्या जीद्दीने पुन्हा उभ्या राहिल्या. स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांचे मोठे योगदान होते.
छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर छत्रपती संभाजी महारांजांचे संगोपन देखील जिजाऊंच्या संस्कारातच झाले.
प्रसंग होता अफजल खानाच्या वधाचा. रायबा महाराजांना सांगतात की, ‘महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाच सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागण अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठतरी अज्ञात स्थळी निघून जा’. त्यावेळी माँसाहेब म्हणजेच जिजाऊ आईसाहेब म्हणाल्या, ‘रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जावून या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये’.
आशा या स्वराज्य जननी ची 17 जून 1674 रोजी जिजाऊंची प्राणज्योत मावळली.
जाणून घेऊया राजमाता जिजाऊ 👇👇👇 यांच्या जन्मस्थळ सिंदखेडराजा बद्दल
राजमाता जिजाऊ जन्मस्थळ, सिंदखेड राजा
जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.
राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.
आज हे स्थळ केवळ ऐतिहासिक स्थळ नाही तर एक पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते.
जिजाऊ माँसाहेबांचा जन्म भुईकोट राजवाड्यामध्ये १२ जानेवारी १५९८ साली झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेड राजा नगरीमध्ये मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वस्तू आहे. ज्या ठिकाणी जिजाऊंनी रंग खेळला तो महाल म्हणजे रंगमहाल. याच महालात शहाजीराजे आणि जिजाऊंच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.
येथे नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरीहाराचे सुंदर शिल्प आहे, तर राजे लखुजीराव जाधवांनी मंदिराचे पुर्नजीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे. या मंदिरासमोरच चौकोनी आकारात तळापर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था असणारी एक भव्य बारव आहे. तर ८व्या ते १० व्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे.
राजेराव जगदेवराव जाधवांच्या कार्यकाळात भव्य किल्यांच्या निर्मितीची सुरवात झाली होती त्याचचं एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती २० फुट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत. यासोबतच साकरवाडा नावाचा ४० फुट उंच भिंतीचा परकोट येथे बघायला मिळतो, त्या परकोटावर निगराणीसाठी अंतर्गत रस्ता, आतमध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वस्तूचे प्रवेशद्वार देखील अतिसुंदर आहे.
मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थीत आणि त्या काळातील जल अभियांत्रीकीचा अतिउत्कृष्ट नमुना. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून, विलोभनीय असा परिसर याला लाभला आहे. मोतीतलावाबरोबरच चांदणी तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळाबारव आहे. ही म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेली देखणी शिल्पकृती. तसेच येथे एक सजनाबाई विहीर आहे, त्या काळी या विहिरीतून गावामध्ये पाणी पुरवठा भुमिगत बंधिस्त नाल्यांच्या द्वारे केल्या जात होत्या, या विहरीत आतपर्यंत उतरण्यासाठी पायऱ्यांची सुविधा देखील आहे.
राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा…!