गरम पाणी पिण्याचे 10 महत्वाचे फायदे

सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे फायदे

1) कमी वयातच म्हतारपणाची लक्षणे दिसत असतील, तर आज पासूनच कोमट पाणी पिणे सुरू करा. अकाली वृद्धत्व(premature aging) शरीरातील free radicals मुळे येते. कोमट पाणी शरीरातील घातक free radicals ला नष्ट करते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील पांढऱ्या पेशी वाढून आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनते.

2) कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात bacteria लढणाऱ्या antibodies सुद्धा वाढतात. त्यामुळे आपण इन्फेक्शन ला लवकर बळी पडत नाही.

3) सकाळी अन्नशापोटी गरम पाणी प्यायल्याने पोटाचा कोठा साफ होतो. बुद्ध कोष्टता (constipation) चा त्रास होत नाही. त्यामुळे दिवसभर ताजे तवाने आणि उत्साही वाटते.

4) मासिक पाळी मध्ये ओटी पोटात दुखत असेल किंवा गोळे (cramps )येत असतील तर , कोमट पाणी आवर्जून प्यावे आराम पडतो.

गरम पाणी पिण्याचे फायदे

5) सकाळी नियमित गरम पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत चालते. परिणामी वाढलेले वजन कमी होते व शरीराला योग्य ती ऊर्जा प्राप्त होते.

6) दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (toxins ) बाहेर टाकले जातात थोडक्यात शरीराला detox करण्याचे काम कोमट पाणी करते. ज्यामुळे किडनी निरोगी राहण्यास मदत होते. सर्दी , खोकला , छातीत कफ होणे अशा अनेक प्रसंगी कोमट पाणी आवर्जून प्यावे. फायदा होतो.

 गरम पाणी

7) गरम पाणी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो . सांध्याला आलेली सूज ओसरते. कारण सांध्याला वंगण पुरवण्याचे काम गरम पाणी करते. आपले स्नायू ८०% पाण्यापासूनच बनलेले असतात.

8)घशात सूज आली असेल किंवा इन्फेक्शन झाले असेल तर नियमित गरम पाणी प्यावे. सूज ओसरते इन्फेक्शन मध्ये आराम पडतो. तुम्हाला खूप जास्त stress म्हणजेच ताण तणाव असेल, अस्वस्थ वाटत असेल, तर सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावून घ्या. मन शांत होईल.

9) गरम पाणी पिणाऱ्यांच्या शरीरात रक्ताभिसरण क्रिया (blood circulation) सुरळीत चालते. त्यामुळे हृदय व धमन्या या निरोगी राहतात. नियमित गरम पाणी प्यायल्याने केस चमकदार होतात आणि त्यांची वाढ वाढते.

10)  त्वचेवर पुरळ, सुरकुत्या असतील तर कोमट पाण्याचे सेवन नक्की करा. गरम पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार व लवचिक देखील बनते. रात्रभर झोप घेतल्यानंतर शरीराला re-hydrate करणे गरजेचे असते. गरम पाणी प्यायल्याने शरीर Rehydrate होते आणी सुरळीत कार्य करू लागते. कोमात पाणी पिण्याचे अनेक फायदे जरी असले तरी काही परिस्थितीत कोमट पाणी न पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

1 thought on “गरम पाणी पिण्याचे 10 महत्वाचे फायदे”

Leave a Comment