CMP प्रणाली द्वारे होणार शिक्षकांचे पगार…

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास कोषागार कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर कोषागार कार्यालयाने तयार केले धनादेश अथवा EFT शाळांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात येऊन तदनंतर अशासकीय वजाती कपात करून वेतनाची रक्कम संबंधिताच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत असल्याने संबंधित वेतन अदा होण्यासाठी (downward movement) विलंब होत असे त्यामुळे सदर विलंब टाळण्यासाठी शासनाने राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन व भत्ते इलेक्ट्रॉनिक्स निधी वितरण प्रणाली( ECS EFT NEFT) द्वारे अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

CMP Products

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत अदा करण्यात येतात ऊक्त नमूद शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची वेतन देयके तयार करून ती मान्यतेसाठी कोषागर कार्यालयामध्ये सादर करण्याची पद्धती टप्पे भिन्न असल्याने शासनामार्फत वेळच्या वेळी वेतन अनुदान अदा होऊनही सदर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये वेतन जमा होण्यास विलंब होत होता त्यामुळे सदर वेतन देखे ऑनलाइन तयार करून कोषागार कार्यालय मध्ये सादर करण्याकरता (upward movement) वित्त विभागाने लागू केलेल्या सेवार्थ प्रणालीच्या धरतीवर शासन निर्णयान्वये शालार्थ संगणक प्रणाली लागू करण्यात आली.

अदात्यांना सत्वर रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने व कोषागारातून होणारी प्रधाने आहरण व सवितरण अधिकाऱ्यामार्फत इ प्रणालीचा वापर करून थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करणे शक्य असल्याने वित्त विभागाने शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई कोषागार कार्यालय नागपूर व मराठवाडा विभागातील कोषागार कार्यालय वगळता सर्व कोषागार उपोषाकार यांच्यामार्फत होणारी सर्व प्रधाने स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून पुरविल्या जाणाऱ्या सीएमपी प्रणाली मार्फत करण्याचा निर्णय घेतला असून सदर प्रणाली संदर्भात आहारांवर संविधान अधिकारी तसेच कोषागार कार्यालयाने यांनी अनुसरावयाची कार्यपद्धती निश्चित केलेली आहे तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व कोषागार कार्यालय नागपूर यांच्याकडील सर्व प्रकारची प्रधाने आहरण व सवितरण अधिकारी यांच्या थेट बँक खात्यातून जमा करण्यास ही कुबेर प्रणाली लागू करण्यात आली असून त्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

शासन निर्णय
जिल्हा परिषदेच्या शाळा मधील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2024 पासूनचे वेतन सीएमपी प्रणाली मार्फत/ज्या जिल्ह्यात ई कुबेर कार्यरत आहे त्या जिल्ह्यात ई कुबेर प्रणाली मार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

◼️ राष्ट्रीयकृत बँकेत वेतन अदा करणे बाबत महत्वाचे , मुख्याध्यापक व लिपिक , शिक्षक यांचे करीता महत्वाची माहिती ◼️ 1 )शालेय शिक्षण विभाग म रा तर्फे दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले. सदर शासन परिपत्रक नुसार मा उच्च न्यायलय , मुंबई यांचे दिनांक 9 फेब्रुवारी 2018 च्या आदेशानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन बँक खाते त्यांच्या इच्छानुसार राष्ट्रीकृत बँकेत उघडण्याचे स्वातंत्र्य राहील.त्यामुळे आपण एकाच शाळेतील सर्व कर्मचारी एका कोणत्याही बँकेत खाते काढु शकतात. 2 ) शालेय शिक्षण विभागाचे दिनांक 4 जानेवारी 2024 च्या शासन निर्णय नुसार राज्यातील खाजगी अनुदानित,अंशत: अनुदानित,प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्य, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणाली द्वारे स्टेट बँकेच्या CMP व इ कुबेर प्रणाली मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन कसे अदा होणार आहे . तसेच सदर शासन निर्णय मधील परिशिष्ट अ नुसार Government कपात व Non Government कपात कशी करावयाची आहे याची कार्यपद्धती नमूद केली आहे. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन CMP /इ कुबेर प्रणाली मार्फत माहे जाने 2024 पासून करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तरी सर्वांनी परिशिष्ट अ चे वाचन करावे. शालार्थ प्रणालीद्वारे वेतन व भत्यांचे प्रदान SBI च्या CMP /इ कुबेर प्रणाली मार्फत होणार आहे. याचा अर्थ असा नाही की SBI मध्ये खाते उघडावे. तो आपला अधिकार आहे. 3) Non government कपात करीता मुख्याध्यापक यांचे नावे other deduction या नावे खाते काढावे. CMP प्रणाली लागू झाल्याने शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खाते काढण्याची आवश्यकता*नाही तरी मा मुख्याध्यापक, लिपिक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी व सर्व संघटना यांनी दिनांक *19 डिसेंबर 2023 शासन परिपत्रक व 4 फेब्रुवारी 2023 चे शासन निर्णय व त्यातील परिशिष्ट अ चे वाचन करावे व दप्तरी ठेवावे ◼️

1 thought on “CMP प्रणाली द्वारे होणार शिक्षकांचे पगार…”

Leave a Comment