22 जानेवारी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता – सुट्टी – National Holidays

Ram Mandir : 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता

Ram Mandir

सुट्टी – National Holidays

22 जानेवारी:   रोजी भारतात राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या सोहळ्याला अनेकाची विशेष उपस्थिती असणार आहे. या दिवसाची भाविक खूप दिवसापासून वाट बघत होते . ते पूर्ण होत राम भक्तांमध्ये  उत्साह दिसून येत आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी मंदिर निर्मितीची जोरदार तयारी सुरू आहे, 24 तास मंदिराचे काम चालू आहे.

आयोध्या येथे  येत्या 22 जानेवारीला राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा  होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत या सोहळ्याला अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहेत यावेळी  केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही भाविक येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 22 जानेवारी होणाऱ्या रामलालच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अनेक राज्यांनी Holidays सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्था बंद राहतील अशी माहिती दिली आहे. याशिवाय त्या दिवशी राज्यभरात दारूची दुकाने बंद राहणार आहे. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 22 जानेवारीला शाळेला सुट्टी म्हणून घोषित केले आहे आणि हा दिवस लोकांनी एखाद्या सणासारखा साजरा करण्यास प्रोत्साहित केले आहे. व मध्य प्रदेश मध्येही दारू विकला बंदी घालण्यात आली आहे.

सुट्टी – National Holidays

आयोध्येतील  राम जन्मभूमी मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त  गोवा सरकारने 22 जानेवारी रोजी सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आयोध्यातील राम मंदिरात नवीन मूर्तीची अभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी छत्तीसगड सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी म्हणून घोषित केली केली आहे. तसेच हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अभिषेक सोहळ्याच्या दिवशी राज्यात कुठेही मध्यबान करण्यास परवानगी दिली जाणार नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आलेले आहे.

National Holidays

आयोध्येतील 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलाल्लाच्या अभिषेक सोहळ्याच्या दिवशी देशभरातील न्यायालयामध्ये वकिलांनी सुट्टीची मागणी केली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे आणि 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालय देशातील सर्वोच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय मध्ये सुट्टी जाहीर करावी असे या पत्र त्यांनी म्हटले आहे. 22 जानेवारी या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात ड्रायडेस घोषित करण्यात आलेला आहे

अनेक संघटना मार्फत 22 जानेवारी रोजी सुट्टी घोषित व्हावी यासाठी मागणी करत आहे.

22 जानेवारीला आयोजित श्रीराम मंदिराचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे 22 जानेवारीला राष्ट्रीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून त्याबाबत हालचाली सुरू आहे. येत्या दोन दिवसात 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभरात राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहे. यामुळे 22 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment